शिक्षिकेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी पीडित महिलेच्या शाळेत दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला आग्रा येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तसेच ती शाळेतील काही विद्यार्थ्यांचे खासगी वर्गही घेते. काही दिवसांपूर्वी १० वीत शिकणारा विद्यार्थी महिलेच्या घरी शिकवणीसाठी गेला होता. तेव्हा शिक्षिका ही आंघोळीला गेली होती. त्यावेळी या विद्यार्थ्याने चोरून तिचा व्हिडीओ काढला. तसेच हा व्हिडीओ दाखवून त्याने पीडित शिक्षिकेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले.

हेही वाचा – आता फक्त भावाचीच हवा; भर वर्गात केलं असं काही की पोरी झाल्या फिदा; VIDEO एकदा पाहाच

आरोपीकडून इंस्टाग्राम व्हिडीओ शेअर

या घटनेनंतर पीडित शिक्षिकेने या विद्यार्थ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला. मात्र, त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या इतर तीन मित्रांना हा व्हिडीओ शेअर केला. तसेच चौघांनी मिळून पुन्हा महिला शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसेच भेटीसाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र, शिक्षिकेने नकार दिल्याने त्यांनी तो व्हिडीओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर अपलोड केला.

हेही वाचा – “शेवटी कर्माचे फळ मिळतेच…” गेंड्याने ट्रकचालकावर केला हल्ला करण्याचा प्रयत्न; पण झालं असं काही… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याला असंच…”

तिघांना अटक, एक आरोपी फरार

याप्रकरणी अखेर शिक्षिकेने पोलिसांत धाव घेत चौघांविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात बोलताना आग्राचे पोलीस उपायुक्त सूरज कुमार राय म्हणाले, ”पीडित महिलेने ३० सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनंतर आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध आम्ही घेतो आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uttar pradesh class 10 student blackmail school teacher after filming obscene video arrested spb