अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसोबत मैत्री जपल्याने अनेक देशांसोबत भारताने विविध पातळ्यांवर भागीदारी केली आहे. दरम्यान, भारतातील लोकशाहीचंही जगभरात कौतुक केलं जातं. याचपार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समनव्यक जॉन किर्बी यांनी भारतातील लोकशाहीचं कौतुक केलं आहे. तसंच, भारतासोबत अमेरिक विविध पातळ्यांवर एकत्र असल्याचंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारत ही एक जिवंत लोकशाही आहे. तुम्ही नवी दिल्लीला गेलात तर, तुम्हाला त्याची अनुभूती येईल. लोकशाही संस्थांचे सामर्थ्य आणि आरोग्य या चर्चेचा भाग असेल अशी मी अपेक्षा करतो”, असं जॉन किर्बी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर जॉन किर्बी यांनी हे भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत जॉन किर्बी म्हणाले की, “ही भेट पुढे जाण्याबद्दल आहे. आम्हाला आशा आहे की पुढे जाऊन एक सखोल, मजबूत भागीदारी आणि मैत्री होऊ शकेल. तुम्ही पाहिले की शांग्री-ला येथे सचिव ऑस्टिन यांनी काही अतिरिक्त संरक्षण सहकार्याची घोषणा केली की आता आम्ही भारतासोबत पाठपुरावा करणार आहोत. अर्थातच, आमच्या दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापार खूप मोठा आहे. भारत पॅसिफिक क्वाडचे सदस्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेच्या संदर्भात एक प्रमुख मित्र आणि भागीदार आहे”, असंही ते म्हणाले.

आपल्या दोन देशांमध्ये केवळ द्विपक्षीयच संबंध नाहीत तर अनेक पातळ्यांवर भारताला निश्चितच महत्त्व आहेत. यासाठी विविध कारणेही आहेत. या सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी आणि मैत्री वाढवण्याकरता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यास इच्छुक आहोत, असंही ते पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India a vibrant democracy says biden white house defending pm modis state visit invite sgk