भारत आणि कॅनडा यांच्यात सुरु असलेल्या तणावाचे पडसाद आता ब्रिटनमध्येही दिसू लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ब्रिटनमधल्या गुरुद्वारात जाणाऱ्या भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तान्यांनी प्रवेशद्वारावरच रोखलं. ही घटना निज्जर हत्येच्या आरोपानंतर जो वाद निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भारताने या बाबत चिंता व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खलिस्तानी हे उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचं दिसतं आहे. त्यानंतर उच्चायुक्तांची कार या ठिकाणाहून निघून जाते हेदेखील या व्हिडीओत दिसतं आहे.

ब्रिटनच्या गुरुद्वारा समितीने भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरइस्वामी यांना निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ते या ठिकाणी आले होते. मात्र या गुरुद्वाराच्या प्रवेश द्वारावरच त्यांना खलिस्तान्यांनी रोखलं आणि पुढे जाऊच दिलं नाही. त्यानंतर गुरुद्वारा समितीला खलिस्तान्यांनी धमकी दिली आहे अशीही माहिती कळते आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारीच दहशतवाद्यांना, खलिस्तान्यांना आश्रय दिल्याप्रकरणी कॅनडावर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. कॅनडा हा दहशतवादी आणि खलिस्तान्यांना आश्रय का देतो आहे? असाही प्रश्न त्यांनी विचारला होता. आता या प्रकरणानंतर ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना अडवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India raises concern with uk after diplomat stopped from entering gurdwara scj