भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथे ‘व्हर्टिकली लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल’ (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या अधिकार्‍यांच्या मते, हे क्षेपणास्त्र सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते.

डीआरडीओने म्हटले आहे की VL-SRSAM भारतीय नौदलासाठी विकसित केले गेले आहे, ज्याचा उद्देश सागरी-स्किमिंग लक्ष्यांसह सीमेवरील विविध हवाई धोक्यांना रोखण्याचे आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अतिशय कमी उंचीवर असलेले इलेक्ट्रॉनिक लक्ष्य नष्ट करण्यासाठी उभ्या लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.

यावेळी भारतीय नौदलाच्या जहाजांकडून भविष्यात प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले नियंत्रकासह उभ्या लाँचर युनिट, कॅनिस्टराइज्ड फ्लाइट व्हेईकल, शस्त्र नियंत्रण प्रणाली इत्यादी सर्व शस्त्र प्रणाली घटकांच्या एकात्मिक ऑपरेशनचे प्रमाणीकरण करण्यासाठी या प्रणालीचे प्रक्षेपण करण्यात आले.

पहा व्हिडीओ-

आयटीआर चांदीपूरद्वारे तैनात केलेल्या ट्रॅकिंग उपकरणांचा वापर करून मापदंडांसह वाहनाच्या उड्डाण मार्गाचे निरीक्षण केले गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि नौदलाचे वर्टिकल शॉर्ट रेंजच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे हवाई धोक्यांचा सामना करण्याची नौदलाची क्षमता वाढेल, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष, डॉ जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी संघांचे अभिनंदन केले आणि यामुळे भारतीय नौदल जहाजांवर शस्त्रास्त्र प्रणाली एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हटले.

“चाचणी प्रक्षेपणावर डीआरडीओ आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी निरीक्षण केले होते. पहिली चाचणी २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेण्यात आली होती आणि कॉन्फिगरेशन आणि एकात्मिक ऑपरेशनची सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध करण्यासाठी ही एक पुष्टी देणारी चाचणी आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.