भारतीय तटरक्षक(आयसीजी) दलास एका कारवाईत मोठे यश आले आहे. शस्त्रसाठा, स्फोटके आणि तब्बल ३०० कोटींची ४० किलो अंमलीपदार्थ घेऊन जाणारी दहा जणांसह असेलेली एक पाकिस्तानी बोट आज(सकाळी) गुजरात किनाऱ्यावर पकडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरात दहशतवाद विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने २५ आणि २६ डिसेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषा(आयएमबीएल) क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी ‘ICGS Arinjay’ हे जलद गस्त जहाज तैनात केले आहे.

आयसीजीकडून प्राप्त माहितीनुसार पहाटे पाकिस्तनची मासे पकडणारी अल सोहेली नावाची एक बोट भारतीय समुद्री हद्दीत संशियीतरित्या फिरताना आढळून आली. आयसीजीने त्यांना हटकल्यानंतरही दिल्यानंतरही बोटीवरील चालकांकडून जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर आयसीजीने त्यांना इशारा देण्यासाठी गोळीबारही केला, परंतु तरीही ती बोट थांबली नाही. यानंतर आयसीजीच्या जवानांनी ती बोट पकडली आणि चालक दलासह सर्वांना ओखा बंदरावर आणले.

हेही वाचा – मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या BSF जवानाला जमावाने केलं ठार

मागील १८ महिन्यांमध्ये गुजरात एटीएस आणि आयसीजीचे हे सातवे संयुक्त अभियान आहे. तर ड्रग्ससह मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आल्याची ही पहिली घटना आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian coast guard has apprehended a pakistani boat with 10 crew carrying arms ammunition and approx 40 kgs of narcotics worth rs 300 crores msr