भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.
भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.Read More
पंतप्रधानांनी परमवीर चक्र सन्मानीत यांची नावे ही अंदमान-निकोबार बेटांच्या समुहात असलेल्या २१ प्रमुख बेटांना दिल्याने अंदमान-निकोबार ही बेटं चर्चेत आहेत
26/11 Mumbai Terror Attack: अफगाणिस्तानातील अमली पदार्थ आता सागरी मार्गाने भारतात आणण्याची दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात आल्यानंतर भारतीय नौदल आणि…
Mumbai Marine Security after Terror Attack: सुमारे साडेसात हजार किलोमीटर्सच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर तब्बल ५० रडार स्टेशन्स अस्तित्वात आली ती एकमेकांशी…