हेक्टरी भातपीकामध्ये चिनी शेतकऱ्याचा अनेक वर्षे अबाधित असलेला १९.४ टनांचा विक्रम बिहारमधील शेतकऱ्याने २२.४ टन भात उत्पादन करून मोडल्यामुळे चीनने आपला पोटशूळ जगजाहीर केला. बिहारी शेतकऱ्याचा भातपीकाच्या विश्वविक्रमाचा दावा तद्दन खोटा असल्याचे चिनी शास्त्रज्ञाने म्हटले आहे. संकरित भातशेतीचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युआन लाँगपिंग यांनी भारतीय शेतकऱ्याच्या उत्पादनाबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त करून, भारतीय शेतकरी १२० टक्के खोटे बोलत असल्याचा अजब दावा केला आहे.
प्रकरण काय?
चिनी दावा काय?