All Party Delegation : पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सात खासदारांचा समावेश असून त्यांच्या अधिपत्याखाली काही खासदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. २३ मेपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याविरुद्ध संयुक्त आघाडी मांडण्याच्या उद्देशाने संसद सदस्यांचे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रमुख जागतिक राजधानींमध्ये पाठवण्याच येणार आहे.

विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आणि ८ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांचं सात शिष्टमंडळे तयार करण्यात आलं आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व बैजयंत पांडा (भाजपा), रविशंकर प्रसाद (भाजपा), संजय कुमार झा (जेडीयू), श्रीकांत शिंदे (शिवसेना), शशी थरुर (काँग्रेस) कनिमोझी करुणानिधी (द्रमुक) आणि सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-शरद पवार) करतील. ते३२ देशांना आणि बेल्जिअममधील ब्रुसेल्समधील युरोपिअन युनियन मुख्यालयाला भेट देणार आहेत.

शशी थरूर, रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, बैजयंत पांडा, कनिमोझी करुणानिधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे १० दिवसांचं आऊटरीच मिशन असणार आहे, याचं समन्वय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करतील. आउटरिच कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्र्यांनी कोण कुठे जाणार आहे याची संपूर्ण यादी जाहीर केली आहे.

ग्रुप १

शिष्टमंडळकोणत्या देशांना भेटणार
बैजयंत पांडासौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, अल्जेरिया
निशिकांत दुबे
फांगनॉन कोन्याक
रेखा शर्मा
असदुद्दीन ओवेसी
सतनाम सिंग सिंधू
गुलाम नबी आझाद
हर्ष श्रृंगला

ग्रुप २

शिष्टमंडळकोणत्या देशांना भेटणार
रविशंकर प्रसादयुके, फ्रान्स, जर्मनी, ईयू, इटली आणि डेन्मार्क
दग्गुबती पुरंदेश्वर
प्रियांका चतुर्वेदी
गुलाम अली खटाना
अमर सिंग
समिक भट्टाचार्य
एमजे अकबर
पंकज सरण

ग्रुप ३

शिष्टमंडळकोणत्या देशांना देणार भेटी
संजय कुमार झाइंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूर
अपराजिता सारंगी
युसूफ पठाण
ब्रिजलाल
जॉन ब्रिटास
प्रदान बरुआ
हेमांग जोशी
सलमान खुर्शीद
मोहन कुमार

ग्रुप ४

शिष्टमंडळकोणत्या देशांना देणार भेटी
श्रीकांत शिंदेयुएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन
बांसुरी स्वराज
ईटी मोहम्मद बशीर
अतुल गर्ग
सस्मित पात्रा
मनन कुमार मिश्रा
एसएएस अहलुवालिया
सुजन चिनॉय

ग्रुप ५

शिष्टमंडळकोणत्या देशांना देणार भेटी
शशी थरुरअमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि केलंबिया
शांभवी
सरफराज अहमद
जीएम हरीश बालयोगी
शशांक मणी त्रिपाठी
भुवनेश्वर कलिता
मिलिंद देवरा
तरनजीत सिंग सिंधू
तेजस्वी सूर्या

ग्रुप ६

शिष्टमंडळकोणत्या देशांना देणार भेटी
कनिमोझी करुणानिधीस्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया
राजीव राय
मियां अल्ताफ अहमद
कॅप्टन ब्रिजेश चौटा
प्रेमचंद गुप्ता
अशोक कुमार मित्तल
मंजीव एस. पुरी
जावेद अश्रफ

ग्रुप ७

शिष्टमंडळकोणत्या देशांना देणार भेटी
सुप्रिया सुळेइजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका
राजीव प्रताप रुडी
विक्रमजीत सिंह साहनी
मनीष तिवारी
अनुराग सिंह ठाकूर
लावू श्री कृष्ण देवरायालू
आनंद शर्मा
व्ही. मुरलीधरन
राजदूत सय्यद अकबरुद्दीन