Communal Clash at Dehradun railway station : उत्तराखंडमधील डेहराडून रेल्वे स्थानकांवर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एक तरुणी दुसऱ्या समाजातील तरुणाला भेटण्यासाठी रेल्वेस्थानकावर आली होती. या भेटीची माहिती मिळताच काही लोकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाच्या समाजातील लोक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी इतरांवर दगडफेक सुरू केली. पाठोपाठ दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. दोन्ही गटांमधील लोकांनी रेल्वेस्थानक परिसरात तोडफोड केली. स्थानकाबाहेर उभ्या वाहनांची तोडफोड केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी दंगेखोर जमावावर लाठीहल्ला सुरू केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेस्थानक परिसरात बराच वेळ तणाव (Communal Clash in Dehradun) निर्माण झाला होता. काही वेळाने पोलिसांनी या स्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र परिस्थिती अद्याप पूर्णपणे निवळलेली नसून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हाणामारी, दगडफेक व लाठीहल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा >> Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा

डेहराडून रेल्वे स्थानकावर नेमकं कय घडलं?

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील एक तरुण सेलाकुई इंडस्ट्रियल एरियात काम करतो. गुरुवारी संध्याकाळी डेहराडून रेल्वेस्थानकावर एका तरुणीला भेटायला गेला होता. तरुणी देखील ठरलेल्या वेळेत रेल्वेस्थानकावर पोहोचली. देघांची भेट झाली. मात्र, या तरुणीच्या समाजातील लोकांना या भेटीची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट रेल्वेस्थानक गाठलं. रेल्वेस्थानकावर आलेल्या लोकांनी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला, या तरुणाच्या समाजातील लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी देखील रेल्वेस्थानक गाठलं. या गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक (Communal Clash at Dehradun Railway station) करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूनेही तसंच प्रत्युत्तर मिळालं.

हे ही वाचा >> Nitin Gadkari : “राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करा”; नितीन गडकरींनी ‘भारतीय रोड काँग्रेस’ला सुनावलं!

दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगफेक झाली. दोन्ही गटांनी रेल्वेस्थानक परिसरात तोडफोड केली. अनेक खासगी व पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं. पाठोपाठ पोलिसांची मोठी तुकडी रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाली आणि त्यांनी या दंगेखोर लोकांवर लाठीहल्ला केला (Communal Clash). पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला.

हे ही वाचा >> Arvind Kejriwal : “मोदी शक्तिशाली आहेत, पण देव नाहीत”, अरविंद केजरीवालांची विधानसभेत टीका; म्हणाले, “मला…”

पोलिसांनी घटनास्थळावरील दगड जप्त केले, फॉरेन्सिक तपासणी होणार

वरीष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी चालू आहे. तसेच त्यांनी दगडफेकीचे सीसीटीव्ही फूटेज व घटनास्थळावरून दगड जप्त केले आहेत, जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं अजय सिंह यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interfaith couple meets at dehradun railway station two communities clashed police lathi charge asc