पीटीआय, इम्फाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुकी व मैतेई पालकत्व असलेल्या सात वर्षांच्या मुलाला त्याची आई व मावशीसह जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेसह वीस प्रकरणे मणिपूर पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहेत. राज्यात ३ मेपासून उफाळलेल्या वांशिक संघर्षांचा तपास सीबीआयने सुरू केला आहे.

पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील इकोइसेंबा येथे ४ जून रोजी पोलीस संरक्षणात निघालेल्या एका रुग्णवाहिकेवर जमावाने हल्ला करून ती पेटवून दिली होती. यात तोंसिंग हांगसिंग हा मुलगा मरण पावला. या मुलाची आई मैतेई समुदायाची असून वडील कुकी आहेत.

गोळीबाराच्या घटनेत डोक्यात गोळी लागून जखमी झालेल्या तोंसिंगला त्याची आई मीना हांगसिंग व मावशी लिडिया लोरेबाम या एक परिचारिका व चालक यांच्यासह रुग्णालयात घेऊन जात असताना जमावाने रुग्णवाहिकेवर हल्ला केला. जमावाने चालक व परिचारिकेला निघून जाऊ दिले, तर हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली.

पोलिसांनी लाम्फेल पोलीस ठाण्यात दाखल केलेला आणि मुलाचे वडील जोशुआ हांगसिंग यांनी कांग्पोक्पी पोलीस ठाण्यात दाखल केलेला असे दोन एफआयआर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation of 20 cases in manipur to cbi amy