scorecardresearch

मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच? प्रीमियम स्टोरी

पंतप्रधानांनी नुकतीच ‘आसाम ट्रिब्युन’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात ते म्हणतात, मणीपूर प्रकरणात सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तिथल्या परिस्थितीत लक्षणीय…

pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान

मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?

मणिपूर या ईशान्येकडील राज्यात वर्षभरापासून जातीय संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. कुकी आणि मैतेई वाद अजूनही मिटलेला नाही. निवडणुकीच्या वातावरणावरही याचा…

Loksabha election 2024
मणिपूर : कुकी समाजाच्या नेत्यांनी घेतला निवडणूक न लढण्याचा निर्णय; जातीय संघर्षाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर?

मणिपूरमध्ये लोकसभेच्या ‘अंतर्गत मणिपूर’ व ‘बाह्य मणिपूर’ अशा दोन जागा आहेत. त्यासाठी अनुक्रमे १९ एप्रिल व २६ एप्रिल रोजी मतदान…

Save Manipur
मोठी बातमी! ज्या निर्णयामुळे मणिपूरमध्ये हिंसा भडकली त्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणाऱ्या आदेशाला अखेर मणिपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या आदेशामुळेच मणिपूरमध्ये हिंसा सुरू झाली,…

manipur violence
कुकी पोलीस हवालदाराच्या निलंबनामुळे मणिपूरमध्ये तणाव, जमावाकडून पोलीस ठाण्यावर हल्ला!

मणिपूरमधील चुराचंदनपूर येथील कुकी पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

myanmar border
“म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालून सरकार आणखी एक बर्लिनची भिंत तयार करणार”; मणिपूर आदिवासी मंचाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारत-म्यानमार सीमेवरून फ्री मूव्हमेंट रेजिम (एफएमआर) मागे घेण्याचा आणि म्यानमारदरम्यान होणार्‍या मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.…

k meghchandra congress
कट्टरपंथी मैतेई गटाने बोलावलेल्या बैठकीत मणिपूर काँग्रेसप्रमुखांना मारहाण? नेमके प्रकरण काय? वाचा..

इंफाळमध्ये कट्टरपंथीय गट अरामबाई तेंगगोल यांनी नुकत्याच बोलावलेल्या मैतेई आमदारांच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार आणि पक्षप्रमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस केंद्र…

kangla fort
कट्टरपंथी मैतेई गटाने आमदारांना बोलावण्यासाठी इंफाळचा कंगला किल्लाच का निवडला? जाणून घ्या कंगला किल्ल्याचे खास महत्त्व..

बिगरसरकारी गटाच्या ‘समन्स’वर आमदारांची उपस्थिती या महत्त्वाव्यतिरिक्त मैतेईच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कंगला किल्ल्याची निवडही महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

maitei manipur
मणिपूरमध्ये मंत्री आणि आमदारांनाही उपस्थित राहण्याचा दबाव निर्माण करणारा मैतेई समाजाचा ‘तो’ कट्टरपंथी गट नेमका कोणता?

कट्टरपंथी मैतेई गटाच्या नेत्यांना भेटण्यासाठी मणिपूरमधील मैतेईचे जवळपास सर्व आमदार तसेच राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा आणि राज्यसभा खासदार सकाळी इम्फाळच्या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×