Iran Attack On US Military Bases : इस्रायल-इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांना टार्गेट करत हवाई हल्ले करत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात विध्वंस होत आहे. असं असतानाच या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणवर हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. यानंतर आता इराणनेही अमेरिकेला मोठं प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.
इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागले असून अमेरिकेच्या कतारमधील हवाई तळांवर मोठा हल्ला आहे. त्यामुळे आता हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. कतारमध्ये मध्य पूर्वेतील अमेरिकेचं सर्वात मोठं लष्करी तळ आहे. मात्र, याच ठिकाणी इराणने आता क्षेपणास्त्रे डागले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतार देखील अलर्ट झालं असून कतारने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणी सरकारी टेलिव्हिजनने ऑपरेशन बेशरत फतह सुरू करण्याची घोषणा केल्याचं म्हटलं आहे. तसेच हे हल्ले इराणने अमेरिकेच्या विरुद्धच्या मोहिमेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्स आणि एएफपी वृत्तसंस्थांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितलं आहे की, कतारची राजधानी दोहा येथेही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणी क्षेपणास्त्रे कतारमधील अमेरिकन हवाई क्षेत्रांना लक्ष्य करत होती. मात्र, या हल्ल्यात जीवितहानी झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांना टार्गेट करत क्षेपणास्त्रे डागल्यामुळे कतारने अलर्ट जारी केला आहे. तसेच कतारने आपलं हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद केलं आहे. सुरक्षेच्या धोक्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अचानक आलेल्या या इशाऱ्यांमुळे दोहामध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि विद्यापीठांपासून ते कार्यालयांपर्यंत अनेक संस्थांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरातच राहण्याचे निर्देश दिले असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
??| Iran’s SNSC:
— ADAM (@AdameMedia) June 23, 2025
The number of missiles used in this successful operation was the same as the number of bombs that the US had used in the attack on Iran's nuclear facilities.
The attack posed no threat to the brotherly country of Qatar’s urban areas
pic.twitter.com/xXBVIJIfu4
अमेरिकेने इराणचे कोणत्या ३ अणुकेंद्र हल्ला केला होता?
अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला असून यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे इराणचे ३ अणुकेंद्र नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.