Iran-Israel War Highlights: इराण आणि इस्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत इराणमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात किमान ६३९ लोक मारले गेले आहेत, अशी माहिती ह्युमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने दिली. तर रॉयटर्सने इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तिथे २४ नागरिक मारले गेले आहेत.

इराणमधील संघर्ष तीव्र होत असताना भारताने तेथील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी रात्री दिल्ली विमानतळावरून इराणहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान आले. ज्यात २९० भारतीय विद्यार्थी होते. आजही दोन विमाने आणखी येणार आहेत.

Live Updates

Iran-Israel War News LIVE Updates

21:27 (IST) 21 Jun 2025

हुथींची अमेरिकेला धमकी

येमेनच्या हुथींनी अमेरिकेला धमकी देत, स्पष्टपणे म्हटले आहे की, जर अमेरिका इराण-इस्रायल युद्धात उडी घेण्याची तयारी करत असेल तर ते त्यांच्यावरही हल्ला करतील. याचबरोबर लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांना लक्ष्य केले जाईल.

19:45 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel News LIVE Updates: इराणच्या अणु संशोधन सुविधांवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा

इस्रायली सैन्याने इराणमधील अणुसंशोधन केंद्रवार हल्ला करत तीन वरिष्ठ इराणी कमांडर ठार केल्याचा दावा केला आहे. यानंतर आता हा संघर्ष दीर्घ युद्ध मोहिमेत बदलू शकतो, असी शक्यता दोन्ही राष्ट्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

18:49 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel News LIVE Updates: अयातुल्ला खामेनींना हत्येची भीती, बंकरमध्ये आश्रय; उत्तराधिकाऱ्याची घोषणा होणार

इराणवर इस्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांद्वारे संवाद साधणे सोडले असून आपल्या विश्वासू लोकांमार्फतच ते बोलत आहेत. तसेच त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचीही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

18:48 (IST) 21 Jun 2025

इराणचा आणखी एक कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार; ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप

Iranian commander Killed: इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ कमांडर्स आणि हमासच्या प्रमुख नेत्यांमधील इझादीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. …अधिक वाचा
14:51 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel News LIVE Updates: ‘अमेरिका इस्रायलसह इराणच्या विरोधात युद्धात उतरल्यास जगासाठी धोका’ – इराणचे मंत्री

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी सांगितले की, इस्रायबरोबर सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने सहभाग घेतल्यास जगासाठी धोका निर्माण होईल. इस्तंबूलमध्ये पत्रकारांशी बोलताना, अरघटी यांनी अमेरिकेची कारवाई अत्यंत दुर्दैवी असेल, असे म्हटले.

14:14 (IST) 21 Jun 2025

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं इस्रायल-इराण संघर्षाबाबत पुन्हा मोठं भाष्य; म्हणाले, “इराणवरील हवाई हल्ले…”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्षाबाबत पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं आहे. …अधिक वाचा
12:33 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel News LIVE Updates: भारत नेपाळ, श्रीलंकेच्या लोकांनाही इराणमधून बाहेर काढणार

भारताने इराणमधून आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिकांना बाहेर काढले आहे. तर इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, नेपाळ आणि श्रीलंकेमधील नागरिकांनाही बाहेर काढण्यात भारत मदत करणार आहे.

11:16 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel News LIVE Updates: इराणमधील इस्फहान अणुस्थळाला इस्रायलने केले लक्ष्य

इराणच्या इस्फहान अणुस्थळाला इस्रायलने लक्ष्य केले होते, मात्र या हल्ल्यात धोकादायक पदार्थांची गळती झाली नाही, असे वृत्त इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने शनिवारी दिले.

11:13 (IST) 21 Jun 2025

Iran-Israel War News LIVE Updates: ऑपरेशन संधू द्वारे भारत सरकारने २९० भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून मायदेशी आणले

इराणच्या मशहाद येथून भारतातील २९० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शुक्रवारी मायदेशी आणण्यात आले. ऑपरेशन संधूद्वारे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजही आणखी दोन विमाने येणार आहेत. परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेकजण जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगितले जाते.

इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला? ट्रम्प यांचा इराणच्या सर्वोच्च नेत्याला इशारा, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)