जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. परिसरात आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी घेरल्याचे वृत्त असून अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.
पुलवामामधील तहाब परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. रविवारी सकाळी पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधीत होते अशी माहिती समोर येत आहे. या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. या भागात आणखी एक दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी घेरल्याचे वृत्त आहे. परिसरात चकमक सुरु आहे.
दरम्यान, या वर्षी १६ जुलैपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये १०४ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केल्याची माहिती केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संसदेत दिली होती. गेल्यावर्षी काश्मीरमध्ये १५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधील काही ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिज्बुल मुजाहिद्दीनने घेतल्याची माहितीही सरकारने दिली होती.
J&K: An encounter underway between terrorists and security forces in Tahab area of Pulwama, more details awaited. pic.twitter.com/J3BFlLECQZ
— ANI (@ANI) July 30, 2017
J&K: Two terrorists killed in Pulwama encounter. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/rFxMsIDjP5
— ANI (@ANI) July 30, 2017