तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांनी चुकीचे वृत्त दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर अपोलो रुग्णालयाने जयललिता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट केले आणि अफवांचा बाजार थंडावला. गेल्या दोन महिन्यापासून अपोलो रुग्णालयात भरती असलेल्या जयललिता यांना रविवारी संध्याकाळी ह्रदविकाराचा तीव्र झटका आला. जयललिता यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृहमंत्र्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी असलेले सी विद्यासागरराव यांना तात्काळ तामिळनाडूला जाण्याचे आदेश दिले. सी विद्यासागर यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. या दरम्यानच्या काळात रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. तसेच तामिळनाडू पोलिसांना हायलअलर्टचा इशारा देण्यात आला. जयललिता यांच्यावर उपचार करण्यासाठी लंडनमधील ह्रदयरोगविषयक तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बेले यांची मदत घेतली जात आहे. जयललिता यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डॉ. बेले यांनी दिली. सोमवारी संध्याकाळी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरू लागल्याने रुग्णालयाबाहेरील परिस्थिती तणावपूर्ण बनली. संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयाजवळ लावलेले बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.एआयएडीएमकेच्या पक्ष कार्यालयाबाहेरील पक्षाचा झेंडाही अर्ध्यावर उतरवण्यात आल्याने तणावात भर पडली. मात्र काही वेळातच हा झेंडा पुन्हा वर घेण्यात आला. दुसरीकडे एआयएडीएमकेच्या आमदारांची सोमवारी संध्याकाळी बैठक पार पडली. तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी या बैठकीत विचारमंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीदेखील सोमवारी संध्याकाळी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिले जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली होती. मात्र रविवारी संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजताच अपोलो रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पूजाअर्चनाही सुरु झाल्या आहेत.
Live Updates
08:59 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805606785365131264
08:23 (IST) 5 Dec 2016
केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सज्ज राहण्याचे आदेश
08:20 (IST) 5 Dec 2016
एआयएडीएमकेच्या आमदारांना चेन्नईत दाखल होण्याचे आदेश- टीव्ही रिपोर्ट
08:20 (IST) 5 Dec 2016
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती चिंताजनक: अपोलो रुग्णालय
08:05 (IST) 5 Dec 2016
चेन्नई शहरात शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात
07:41 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805590105431818240
07:41 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805584865257062400
07:41 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805583172419219456
07:41 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805582587406073856
07:41 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805581617771122688
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805581055612755968
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805530838737661952
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805504541709844482
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805494807212605440
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805468441310175232
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805467324509585408
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805463129035448320
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805447147864764416
07:40 (IST) 5 Dec 2016
https://twitter.com/ANI_news/status/805442386146914304