सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. बऱ्याचदा हे व्हिडीओ करमणुकीचे असतात. तर काही वेळा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये मोठी खळबळ उडते. झारखंडमध्ये देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याचे पडसाद थेट मंत्रिमंडळात पाहायला मिळाले आहेत. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बन्ना गुप्ता एका तरुणीशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. तर ती तरुणी न्युड आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी बन्ना गुप्ता यांच्यावर टीका सुरू केली आहे. तर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बन्ना गुप्ता म्हणाले की, हा व्हिडीओ फेक आणि एडिटेड आहे. तसेच गुप्ता यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

गुप्ता म्हणाले की, माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्या राजकीय विरोधकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा व्हिडीओ एडिट केला आहे. मी एफआयआर दाखल केला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> “झोळी लटकवशील आणि…”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

भाजपा खासदाराने शेअर केला अश्लील व्हिडीओ

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी संध्याकाळी मंत्री बन्ना गुप्ता यांचा अश्लील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, महिलांचा आदर कसा करायचा हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही. हेच काँग्रेसचं चारित्र्य आहे.