काश्मीरमधील गंडेरबल जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच ठार कऱण्यात आलेल्या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यापैकी कोणीही स्थानिक नसल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-लेह महामार्गापासून जवळच असलेल्या जंगलामध्ये हिझबुल मुजाहिद्दीन या संघटनेचे दहशतवादी तेथील नदी ओलांडून जात असताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पणही करण्यास सांगितले परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व गोळीबार करण्यास सुरूवात केली. अखेरीस पोलीस दलाने हल्लाकरून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच याभागामध्ये दहशतवादी दडले असल्याची कुणकूण लष्कराला याआधी लागली होती. ठार झालेले सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याची शक्यता सुरक्षा दलाच्या सुत्रांकडून व्यक्त कऱण्यात आली आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jk 5 hizbul mujahideen terrorists killed by security forces in ganderbal