देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.
भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.Read More
रझाकारांच्या अनन्वीत अत्याचारातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्या या दोन शहिद सैनिकांचा पंच्याहत्तर वर्षानंतर सन्मान केला जात आहे.
धावत्या रेल्वेगाडीत रेल्वेच्या सशस्त्र जवानानेच केलेल्या गोळीबाराची घटना आत्ताची असेल, पण त्याहीआधी या सशस्त्र जवानांच्या ‘भारतीयत्वा’साठी समाजमाध्यमांबद्दल त्यांना सावध करणे…
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून भारताच्या सीमावर्ती भागात असलेल्या सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेत असल्याचे…
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक ठिकाणी सीमा सुरक्षा दलाला पाचारण केलं…