देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून स्टील उद्योग श्रेत्रातील आघाडीची कंपनी JSW ग्रुपनं मदतीचा हात पुढे केला आहे. JSW ग्रुप तब्बल १०० कोटींची मदत करणार आहे. पंतप्रधान सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. JSW ग्रुपकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे.

JSW मध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा करेल. त्याशिवाय कंपनीकडून जेवण आणि इतर सुविधांची सोयही केली जाणार आहे. तसेच करोना व्हायरसवर मात करण्यासाटी JSW ग्रुपकडून आयसोलेशन वार्ड आणि इतर सुविधा उपलबद्ध केल्या जाणार असल्याचे पत्रात म्हटलेय.

भारतामध्ये कोरोनाचं संक्रमण न थांबल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेतच, पण त्याबरोबरच सरकारला सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. त्याचप्रकारे आपण कोरोनाला हरवू शकतो.