काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. ज्योतीरादित्य शिंदे यांच्यावर हवाई वाहतूक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी ज्योतीरादित्य शिंदे यांनी राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांच्या फेसबुक अकाऊंटला मोदी सरकारवरील टीकेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. काँग्रेसमध्ये असतानाचा व्हिडीओ फेसबुकला शेअर केल्याने अनेकांना आश्चर्य वाटत होतं. मात्र आता त्याचं खरं कारण समोरं आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शपथ घेतल्यानंतर काही तासातच ज्योतीरादित्य शिंदे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं होतं. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये ज्योतीरादित्य शिंदे भाजपा आणि मोदी सरकारवर टीका करत आहेत. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा ज्योतीरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये होते.

Explained: मोदींच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार; ‘या’ १० गोष्टी जाणून घेणं महत्वाचं

व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर ज्योतीरादित्य शिंदे यांच्या सोशल मीडिया टीमने तात्काळ हा व्हिडीओ हटवला आणि अकाऊंट पुन्हा एकदा सुरळीत केलं.

माजी आमदार रमेश अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी ग्वालियर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ज्योतीरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता मिळवून दिली होती. त्यांच्यासोबच जवळपास दोन डझन आमदार भाजपात आले होते.

ज्योतीरादित्य यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारल्याने कमलनाथ सरकार १५ महिन्यात कोसळलं होतं. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतीरादित्य शिंदेंना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आलं आणि शिवराज सिंग पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia facebook account hacked soon after taking oath as cabinet minister sgy