जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याला शनिवारी एम्स रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्यानंतर त्याने गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
जेएनयू संकुलातील शैक्षणिक वातावरण दूषित होऊ नये आणि शांतता भंग होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला संकुलात निमंत्रित करू नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. जेएनयूमधील पाच विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपले उपोषण सोडले होते.
मात्र १५ विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू ठेवले होते. कन्हैयाकुमारला शुक्रवारी अर्धबेशुद्धावस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्याला घरी पाठविण्यात आले असून काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. प्रकृतीचा विचार करून कन्हैयाकुमारने उपोषण सोडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar hunger strike end