Owner clarifies Over Karachi Bakery Name : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. यादरम्यान हैदराबाद येथील प्रसिद्ध कराची बेकरीच्या विरोधात देखील आंदोलन केले जात आहे. यादरम्यान या बेकरीचे मालकांनी त्यांचे आजोबांनी या बेकरीचे नाव कराचीच्या नावावर ठेवले होते. अनेक जण ही बेकरी कराचीची असल्याचे सांगत आंदोलन करत आहेत. पण ही बेकरी भारतीय असून याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.

पीटीआय या वृत्त संस्थेशी बोलताना हैदराबाद येथील खराची बेकरीचे मालक म्हणाले की, “आमचा ब्रँड कराची बेकरी १९५३ पासून हैदराबादमध्ये आहे. आमच्या आजोबांनी हैदराबादमध्येच कराची बेकरीची सुरूवात केली होती. आज आम्हाला ७२ वर्षे झाली आहेत. आम्ही भारतीयच आहोत. आमचं सर्वकाही भारतातच आहे. १९४७ नंतर जेव्हा आमचे आजोबा भारतात आले होते तेव्हा ते तेथून त्यांचं नाव घेऊन आले होते. तेव्हा देखील ते हैदराबादमध्ये होते (सध्या पाकिस्तानात असलेलं हैदराबाद) आणि या हैदराबादमध्ये देखील ते हे नाव घेऊन आले होते”

दुसरा एक व्यक्ती म्हणाला की, “आपले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आपले डीजीपी आणि आपले कमिश्नरेट यांना विनंती करतो की आम्हाला पाठिंबा द्या. सध्या संपूर्ण भारत ज्या समस्येतून जात आहे ते आम्हाला समजते. पण आम्हाला पाठिंबा द्या. सर्व अधिकाऱ्यांनी बेकरीच्या नावात कोणताही बदल करण्यापासून रोखण्यासाठी मदत करा. लोक शहरातील बेकरीच्या दुकानांवर तिरंगा लावत आहेत. अनेक लोक आंदोलन करत आहेत की ही कराचीची आहे. पण खरंतर हा भारतीय ब्रँड आहे, पाकिस्तानी ब्रँड नाही.”

मीडिया रिपोर्टनुसार, कराची बेकरी हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दशकांपासून हैदराबादमधील कराची बेकरीचे केक सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकराची बिस्कीटे मिळतात. हैदराबाद आणि सिकंदराबाद येथे मिळून कराची बेकरीचे १५ हून अधिक स्टोअर्स आहेत. तसेच ही कंपनी २०हून अधिक देशांमध्ये बिस्किटे आणि इतर अनेक वस्तू निर्यात करते. ज्यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.