केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या नागरी हत्यांमध्ये काश्मिरींचा सहभाग नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी रविवारी सांगितले, ते म्हणाले, काश्मिरींना बदनाम करण्याच्या षडयंत्राखाली हे हल्ले करण्यात आले. माजी मुख्यमंत्र्यांनीही या घटनांना केंद्रशासित प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले, “या हत्या दुर्दैवी आहेत आणि एका षडयंत्राखाली केल्या आहेत. काश्मिरी लोक या हत्यांमध्ये सामील नाहीत. हा काश्मिरींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा – काश्मीरमधील परिस्थिती चिघळली ; दहशतवाद्यांकडून आणखी दोन परप्रांतीयांची हत्या

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांक समुदायाच्या चार नागरिकांसह एकूण सात नागरिकांची हत्या केली, ज्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि राजकीय पक्षांनी सुरक्षा यंत्रणेवर टीका केली.

हेही वाचा – ISI कडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; आसाममध्ये हाय अलर्ट जारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेबद्दल विचारले असता फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मैत्रीकडे नेणारा कोणताही उपक्रम स्वागतार्ह आहे. “आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि आशा केली पाहिजे की दोन्ही देशांमध्ये मैत्री आहे आणि आम्ही (शांततेत) जगू शकतो,” अब्दुल्ला पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmiris not involved in recent targetted civilian killings farooq abdullah vsk