Kerala couple known for family counselling lands in domestic violence row: केरळमधील एका रिलेशनशीप कोचने तिच्या इन्फ्लूएन्सर असलेल्या पतीवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. जिजी मारिओ आणि मारिओ जोसेफ असे या दोघांची नावे आहेत. हे दोघे ‘आनंदी कौटुंबिक जीवन’ यासाठी सोशल मीडियावर रिलेशनशिप काउंसलिंग संबंधी चर्चा आणि सल्ले देण्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत.

जिजी मारयोनो दिलेल्या तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पतीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेमधील दुखापत करणे, चुकीच्या पद्धतीने रोखणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे यासंबंधीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

थ्रिस्सूर येथील चालकुडी पोलिसांनी दाखल नोंदवलेल्या एफआयआरनुसार महिलेने आरोप केला आहे की मारियो जोसेफ यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या मोबाईल फोनची तोडफोड केली. ही घटना कथितपणे २५ ऑक्टोबर रोजी घडली. एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अडचणींमुळे हे जोडपे गेल्या नऊ महिन्यांपासून वेगळे राहत आहे.

नेमकं काय झालं?

२५ ऑक्टोबर रोजी गिगी या मारियो यांच्याशी त्यांच्यातील समस्येविषयी बोलत होत्या, तेव्हा कथितपणे त्यांनी त्यांच्या डोक्यात सेट टॉप बॉक्स मारला, केस पकडून फरफटत नेले आणि मारहाण केली, असे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. तसेच मारियो यांनी त्यांचा ७०००० रुपये किंमतीचा मोबाईल फोन फेकून देत त्याचे नुकसान केले असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

या जोडप्याने फिलोकॅलिया फाउंडेशन (Philokalia Foundation) ची स्थापना केली आहे. या फाउंडेशनकडून कुटुंब समुपदेशन , वैवाहिक सेवा आणि वेगवेगळी चॅरिटेबल कामे केली जातात.

दोघेही प्रोफेशनल्स, किशोरवयीन मुले आणि तरूणांसाठी स्पिरीच्युअल टॉक्स, मोटिव्हेशनल स्पीचेस आणि ओरिएन्टेशन क्लासेस घेतात. यापैकी बहुतेक कार्यक्रम हे वेगवेगळ्या चर्चच्या अंतर्गत घेतले जातात. याबरोबरच हे जोडपे फिलोकॅलिया फाउंडेशनच्या अंतर्गत रिट्रीट कार्यक्रम देखील आयोजित करत असत