केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा येथील डोंगरावर अडकलेल्या एका ट्रेकरची लष्कराने बुधवारी सुटका केली. २३ वर्षीय चेराट्टिल बाबू नावाचा हा ट्रेकर ४० तासांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी अडकून पडला होता. त्या ठिकाणी लष्कराच्या बचाव पथकाचा एक सदस्य पोहोचला आणि त्याला अन्न आणि पाणी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर सुरक्षेच्या दोरीच्या साहाय्याने बाबूला मलमपुळा येथील कुरुंबाची टेकडीच्या शिखरावर नेले आहे, तेथून त्याला विमानाने खाली नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या पर्वतारोहण तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक या कारवाईची आखणी करण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा मालमपुळा येथे पोहोचले होते.

बुधवारी पहाटे, दक्षिण कमांडने एका ट्विटमध्ये सांगितले की, ऑपरेशन सुरू झाले आहे आणि घाटात अडकलेल्या बाबूपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणांहून प्रयत्न केले जात आहेत.

बाबूने सोमवारी दोन मित्रांसह डोंगरावर ट्रेक केला होता. उतरताना, तो घसरला आणि खोल दरीत पडला. या दरीची खोली शिखरापेक्षा २०० फूट असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, यावेळी बाबूच्या पायाला दुखापत झाली. तो दरीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यात अयशस्वी झालेले त्याचे मित्र टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर त्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala trekker stuck in niche on hill in malampuzha rescued by army hrc