'कृष्ण आणि हनुमान हे सर्वात महान मुत्सद्दी', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितली रामायणातल्या 'इंटेलिजन्स'ची गोष्ट | Krishna and Hanuman are Greatest Diplomats In World says S Jaishankar | Loksatta

‘कृष्ण आणि हनुमान हे सर्वात महान मुत्सद्दी’, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितली रामायणातल्या ‘इंटेलिजन्स’ची गोष्ट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी मुत्सद्दीपणाची व्याख्या सांगताना भारतातली महाकाव्ये जसे की, महाभारत आणि रामायणाचं महत्त्वं सांगितलं.

S Jaishankar on Hanuman and krishna
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी मुत्सद्दीपणाची व्याख्या सांगताना भारतातली महाकाव्ये जसे की, महाभारत आणि रामायणाचं महत्त्वं सांगितलं.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी मुत्सद्दीपणाची व्याख्या सांगताना भारतातली महाकाव्ये जसे की, महाभारत आणि रामायणाचं महत्त्वं सांगितलं. जयशंकर हे त्यांचं पुस्तक ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अ‍ॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या पुणे येथे आयोजित विमोचनच्या (Redemption) कार्यक्रमात बोलत होते. जयशंकर म्हणाले की, “भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वात महान मुत्सद्दी आहेत. हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली.”

एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर करण्यात आलं आहे. ‘भारत मार्ग’ असं या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचं नाव आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसं राखायचं ते शिकवलं. कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध माफ केले. परंतु त्यानंतर त्याचा वध केला.

हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी २१ पक्षांना आमंत्रण, तृणमूलसह हे ९ पक्ष येणार नाहीत, कारण काय?

इंटेलिजन्सच्या जोरावर हनुमानाने मिशन पूर्ण केलं

परराष्ट्र मंत्र्यांनी कुरक्षेत्राचा संदर्भही यावेळी दिला. ते म्हणाले की, “कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचं युद्ध झालं होतं. लोक असं म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिलं तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते. ते कोणत्या परिस्थितीत होते, त्यांना कोणतं मिशन दिलं होतं, ते मिशन हनुमानाने कसं पूर्ण केलं. आपल्या इंटेलिजन्सचा परिचय देत ते इतक्या पुढे गेले की, त्यांनी मिशन तर पूर्ण केलंच, परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकादेखील जाळून टाकली.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 14:15 IST
Next Story
ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर