Premium

राष्ट्रवादीच्या राज्याबाहेरील एकमेव खासदारावर खूनाचा आरोप, कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्विप येथील खासदार मोहम्मद फैजल यांना सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.

Lakshadweep MP Mohammad Faizal
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार मोहम्मद फैजल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याबाहेर एकमेव खासदार आहेत. लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. त्यांना खून करण्याच्या प्रयत्नासाठी लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००९ च्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा आग्रही भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रकरण

या प्रकरणातील वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, खासदार मोहम्मद फैजल आणि इतर तीन आरोपींनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राजकीय विषयांवरुन हा हल्ला घडला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या सालेह यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lakshadweep ncp mp gets 10 years in jail in attempted murder case kvg