भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मोदी आडनावच्या टिप्पणीवर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणात शुक्रवारी दिलासा दिला. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. मात्र सार्वजनिक जीवनात अशा प्रकारे वक्तव्य करणं हे राहुल गांधींकडून अपेक्षित नाही असं परखड मत हरीश साळवे यांनी मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरीश साळवेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

“मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी जे काही वक्तव्य केलं त्यासाठी त्यांना दोषी ठरवलं जावं की नाही हा मुद्दा वेगळा आहे. मात्र कुणाविषयी टिप्पणी करताना अशा पद्धतीची भाषा वापरणं हे अत्यंत वाईट आणि वेदनादायी आहे. लोकांवर खोटे आरोप करता आणि सांगता की मी सार्वजनिक आयुष्यात आहे. मात्र राहुल गांधी हे रात्री झोपताना हा विचार करत असतील का? की भारताचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहतो आहे तर मी अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? ” हरीश साळवेंनी NDTV च्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

हरिश साळवे आणखी काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली मात्र त्यावेळी हेदेखील सांगितलं की जे तुम्ही बोललात ते चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही करायला नको होतं. अद्याप सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही फक्त गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. असंही

काय आहे हे प्रकरण?

१३ एप्रिल २०१९ या दिवशी राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलार या ठिकाणी प्रचारसभेच्या भाषणा दरम्यान मोदी आडनावाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. राहुल गांधी म्हणाले होते की सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच कसं काय असतं? त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांना गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी या शिक्षेला स्थगिती दिली आहे. हा निर्णय आल्यानंतर राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Language of rahul gandhi highly disrespectful said harish salve in interview scj