सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात बुधवारी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हंगामी सभापती कमलनाथ यांनी मुंडे यांच्या अकाली निधनाबद्दल शोकप्रस्तावाचे वाचन केले. यानंतर दोन मिनिटे उभे राहून सर्व सदस्यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला बुधवारी सुरुवात झाली. माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांची या सत्रासाठी हंगामी सभापती म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कमलनाथ यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्री आणि विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
सोळाव्या लोकसभेमध्ये आपले सरकार सर्वसामान्य माणसांच्या आशा आकांक्षांची पूर्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल, असे मोदी यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले.