खऱ्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी माणसं काहीही करतात. होय अगदी काहीही करतात असंच म्हणायला हवं. अनेकजण जोडीदार शोधण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. अनेकजण मॅट्रीमोनियल साईट्सचा पर्याय निवडतात. कुणी सोशल मीडियाचा पर्यायही निवडतात. तर अनेकजण खरंच काहीही करतात हे आम्ही म्हणतोय कारण म्हणजे टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी घडलेली लक्षवेधी घटना. टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी एका महिलेच्या हाती असलेल्या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

नेमकं काय घडलं टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी?

टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी एका महिलेने हातात घेतलेलं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. या पोस्टरवर लिहिलं होतं भारतीय नवरा हवा. या महिलेने हाती घेतलेल्या या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. तसंच या महिलेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर चांगलाच व्हायरलही झाला. इतकंच नाही तर त्या ठिकाणी जी महिला पोस्टर घेऊन उभी होती तिला पाहण्यासाठीही न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी गर्दी झाली.

स्पायडर मॅनची एंट्री

दरम्यान ही महिला हा फलक हाती घेऊन उभी असताना स्पायडर मॅनचा ड्रेस घातलेल्या एका माणसाने एंट्री घेतली. तो माणूस तिच्या दिशेने गेला. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेही होतं. हे सगळे क्षण विनोदीच होते. अनेकांनी ते आपल्या मोबाइलच्या कॅमेरात कैद केले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

लोक या व्हिडीओबाबत काय म्हणत आहेत?

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता फलक घेऊन उभी असलेली ही मुलगी कोण? याच्या विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तसंच लोक हे देखील विचारत आहेत की या मुलीला भारतीय नवराच का हवा आहे? यामागचं कारण काय? अनेक युजर्स म्हणत आहेत की भारतीय पुरुष हे कुटुंबवत्सल असतात आणि अनेक परंपरा त्यांच्या ठायी असतात. त्यामुळेच या महिलेला बहुदा भारतीय पती आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा असेल.

शाहरुख खानलाही नेटकऱ्यांनी ओढलं चर्चेत

न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरचा हा व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर काहींनी चर्चेत चक्क अभिनेता शाहरुख खानलाही ओढलं आहे. शाहरुख खानची हिंदी चित्रपटातली इमेज ही रोमँटिक हिरो अशी आहे. त्याचे चित्रपट न्यू यॉर्कसह जगातल्या अनेक शहरांमध्ये पाहिले जातात. शाहरुख खानची इमेज ही रोमँटिक हिरो आहे. शिवाय तो अनेक चित्रपटांमध्ये पत्नीला मदत करत असल्याचंही दाखवण्यात आलं आहे त्यामुळेही कदाचित ही महिला भारतीय नवराच हवा असा फलक घेऊन उभी असावी असं नेटकरी म्हणत आहेत. न्यूज १८ ने हे वृत्त दिलं आहे.