वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाने सर्वांना मोहून टाकले. आज पहाटे झालेल्या चंद्रग्रहणासोबतच धुमकेतू पाहण्याचा योग देखील आला. हिरव्या रंगाची छटा असणारा हा धुमकेतू चकाकत होता. या धुमकेतूला ब्लू कॉमेट असे म्हणतात. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते.  सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आले की चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश अडवला जाऊन पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्रग्रहण होते. पृथ्वीची गडद छाया यावेळी चंद्रावर न पडल्यामुळे ग्रहणादरम्यान चंद्रांचं तेज काहीसं कमी झालं, पण चंद्र पूर्णपणे काळा झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळच्या या ग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे चंद्रग्रहण होत असतानाच आकाशात धूमकेतूचंही दर्शन झालं. ४५- पी हा धूमकेतू हे चंद्रग्रहण होताना आकाशामध्ये दिसला. हा धूमकेतू दर सव्वापाच वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. पण चंद्रग्रहण होत असताना हा धूमकेतू आकाशात दिसणं ही एक दुर्मिळ घटना आहे. मुंबईत ११ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता या ग्रहणाला सुरूवात झाली आणि सव्वासहा वाजेपर्यंत हे चंद्रग्रहण चालले.

आज ज्यांना हा योग पाहता आला नाही त्यांना तो परत पाहता येणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. २२ फेब्रुवारी २०३५ ला या प्रकारचे चंद्रग्रहण होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हे पाहण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाबाबत खूप उत्सुकता होती.
४५-पी या धुमकेतूला नव-वर्षाचा धुमकेतू असे म्हटले आहे. कारण या धुमकेतूने २०१६ च्या शेवटी प्रवासाला सुरुवात केली आणि तो नवीन वर्षात दिसला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lunar eclipse chandra grahan 2017 today time in india blue comet