महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढणारी पाकिस्तानातील शालेय विद्यार्थिनी मलाला युसुफझाई हिला रशियातील महिला पत्रकार आणि मानव हक्क कार्यकर्त्यां अॅना पालित्कोव्हस्याका यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुलींनी शाळेत जाऊ नये असा तालिबान्यांनी काढलेला फतवा जिवाची पर्वा करता मलाला युसुफझाई हिने झुगारला होता. अॅना पालित्कोव्हस्याका यांनीही अशा प्रकारेच बंदीविरुद्ध पावले उचलली होती.चेचेनच्या तिढय़ास जोरदार विरोध दर्शवून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या अॅना यांची ७ ऑक्टोबर २००६ रोजी मॉस्कोत हत्या करण्यात आली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-10-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala wins anna politkovskaya award