मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेमध्ये भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत १० जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर येत असून घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरु होती. याच दरम्यान ही दुर्देवी घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवेतमध्ये झालेल्या लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरच्या धडकेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून त्यांचे मृतदेह लष्कराच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान मलेशियाच्या लुमुट नौदल तळावर घ़डली आहे.

हेही वाचा : “मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन”, अमेरिकेने भारत सरकारला दाखवला आरसा; बीबीसीवरील छापेमारीसह राहुल गांधींचाही उल्लेख

मलेशियाच्या नौदलाने याबाबत एका निवेदनात सांगितले की, रॉयल मलेशियन नेव्हीच्या परेडदरम्यान ही घटना घडली. यासंदर्भातील वृत्त बीबीसी न्यूजने दिले आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये असे दिसते की, लष्कराच्या काही हेलिकॉप्टरची परेड सुरु आहे. मात्र, यातील दोन हेलिकॉप्टरची हवेमध्ये धडक झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे रोटर कापले गेले आणि दोन्हीही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. दरम्यान, या घटनेची चौकशी होणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysia two military helicopters crash in 10 people died marathi news gkt