Crime News : गर्भपात केल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याची एक्स-गर्लफ्रेंड सोनल आर्या आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील मजनू का टिला भागात घडला आहे. पोलिसांनी बुधवारी २३ वर्षीय निखील कुमार याला उत्तराखंडच्या हल्दवानी येथून अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकार्‍यांनी सांगितले की आरोपीने बाळाची हत्या ही बदला घेण्यासाठी केली. आरोपीला संशय होता की आर्या ही गर्भवती होती आणि त्या बाळाच्या वडिलांनी तिला गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचा आरोपीला संशय होता.

पोलिसांनी सांगीतले की, आरोपीला संशय होता की २२ वर्षीय आर्यावर दुर्गेश कुमार याने प्रभाव टाकला. दुर्गेश कुमार हा आर्याची मैत्रिण रश्मी देवीचा पती पती आहे, ज्यांच्याकडे आर्या गेल्या काही दिवसांपासून राहत होती. तर निखील हा फूड डिलीव्हरी एजंट म्हणून काम करतो, असे पोलिस म्हणाले.

“नुकतेच, ती गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म देण्याबाबत निर्णय घेतला. निखीलचे मत होते की तीने हे दुर्गेशच्या मदतीने केले. त्यामुळे तो मंगळवारी दुर्गेशच्या मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून एक सर्जिकल ब्लेड घेऊन आला आणि दोघांची हत्या केली. त्याने दुर्गेशच्या मुलीची हत्या केली कारण त्याला वाटे की आर्याने त्यांच्या बाळाचा गर्भपात हा दुर्गेशच्या मदतीने केला,” असे पोलीस उपायुक्त (नॉर्थ) राजा बांथिया म्हणाले.

एक मूल विकले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार आर्या आणि निखील यांची भेट उत्तराखंड मधील हल्दवानी येथे २०२३ मध्ये झाली. ” असे आढळून आले आहे की गर्भवती राहिली आणि तीने २०२४ मध्ये एका बाळाला जन्म दिला आणि त्यांनी ते मूल उत्तराखंडमध्ये विकले. त्यानंतर ते वझिराबाद येथे एकत्र राहू लागले,” असे डीसीपी बांथिया म्हणाले.

बुधवारी आर्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की ती निखिल याच्या छळाला कंटाळली होती आणि त्याला जानेवारीमध्ये सोडून दिले होते. २४ जून रोजी तीने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती.