Crime News : एका १९ वर्षीय मुलीला तिच्या घराच्या पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केल्याप्रकरणी एका २६ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आले आहे. नार्थइस्ट दिल्लीतील अशोक नगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या तौफिक नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. काही काळ लपून बसल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
ही घटना सकाळी ८.३० वाजता दिल्लीतील ज्योती नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित नेहा ही तिच्या घराच्या छतावरून ढकलून देण्यात आल्यानंतर अत्यंत गंभीर स्थितीत आढळून आली होती. त्यानंतर तिला गुरू तेग बहादूर (जीबीटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिला झालेल्या गंभीर जघमांमुळे तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार त्याची ओळ ख लपवण्यासाठी आणि पीडितेच्या कुटुंबातील आणि शेजाऱ्यांपैकी कोणाला ओळखू येऊ नये म्हणून तौफिक हा बुरखा घालून त्या इमारतीत आला होता. त्याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने नेहाच्या घरात कोणालाही संशय न येते जाता यावे यासाठी बुरखा वापरल्याचे तौफिकने कबूल केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली व्यक्ती इमारतीत प्रवेश करताना संशयास्पद स्थितीत बाहेर पडताना पाहायला मिळत आहे, कॉम्प्लेक्समध्ये लावलेल्या अनेक कॅमेऱ्यांमधील फुटेज वापरून पोलीस घटनाक्रमाची संपूर्ण टाइमलाइन पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक आणि नेहा अनेक महिन्यांपासून नात्यामध्ये होते.पण जेव्हा नेहाला कळले की त्याच्या कुटुंबियांनी शोधलेल्या एका दुसऱ्या महिलेशी तौफिक लग्न करण्याचा विचार करत आहे, तेव्हा त्यांच्यात तणाव निर्माण झाला. यावारून छतावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
नेहाच्या कुटुंबियांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. तिच्या वडिलांनी सांगितले की नेहाचे तौफिकशी कधीही प्रेमसंबंध नव्हते आणि ती त्याला राखी बांधायची. कुटुंबाचा दावा आहे की ते तौफीकला जवळजवळ तीन वर्षांपासून ओळखत होते आणि तो त्यांच्या घरी वारंवार येत असे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.