Meerut Murder latest Update : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेरठ येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ राजपूत याती ४ मार्च रोजी हत्या करण्यात आली. परदेशातून त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आळा होता. या हत्येच्या घटनेनंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा मित्र साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आले आहे.

या भयानक हत्या प्रकरणानंतर काळी जादू, मुस्कानचे दारूचे व्यसन आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची मुस्कानची इच्छा याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान या हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने १० प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मेरठ शहरचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की पोलीस अजूनही हत्येच्या कारणांचा तपास करत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की साहिल आणि मुस्कान यांनी सौरभची हत्या केल्याचे कबूल केले आहे. त्यांनी पीडिताचा मृतदेह ड्रममध्ये सिमेंट वापरून सील केला आणि हिमाचलला पळून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी ते परत आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. हत्येसाठी वापरलेले हत्यार देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

विवाहबाह्य संबंध

मुस्कान आणि सौरभ यांचे २०१६ साली प्रेम विवाह झाला होता, मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. सिंह यांनी सांगितलं की, सौरभ याला मुस्कानच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल २०२१ मध्ये माहिती झाले होते. त्यांच्या घरमालकाने त्याला मुस्कान आणि साहिल यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याबद्दल सांगितले होते.

एसपींनी सांगितले की, चौकशीदरम्यान मुस्कानने सांगितलं की ती २०१९ पासून साहिलबरोबर अनैतिक संबंधांमध्ये होती. याबद्दल सौरभला माहिती होती आणि २०२१ मध्ये त्यांनी घडस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्याला पत्नीबरोबर राहण्यासाठी राजी केले. मुस्कानने दावा केला आहे की साहिल याला दारूचे व्यसन होते , ज्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होते असत.

यापू्र्वीही हत्येचा प्रयत्न

मुस्कानच्या कुटुंबाने यापूर्वी साहिलवर तिला ड्रग्जचे व्यसन लावल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी सांगितले की ते भेटले की दारू घ्यायचे, परंतु मुस्कानने दावा केला आहे की ती साहिलला भेटण्यापूर्वीपासूनच दारू पित होती.

२०२३ पासून सौरभ हा लंडन येथील बेकरीमध्ये काम करत होता. तो २४ फेब्रुवारी रोजी भारतात परत आला. आरोपींनी २५ फेब्रुवारी रोजी त्याच्या हत्येचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. अखेर ३ मार्च रोजी त्यांनी त्यांची योजना पार पाडली, असे सिंह म्हणाले.

हत्येच्या प्रकरणाच्या तपासासाठी दोन टीम स्थापन केल्याचेही सिंह यांनी सांगितले. हत्येसाठी ड्रम आणि इतर साहित्य विकत घेतलं ते दुकान शोधण्यात आले आहेत आणि दुकानदारांची चौकशी केली जात आहे. अधिक पुरवे गोळा करण्यासाठी एक टीम शिमला येथे देखील जाणार आहे.

काळी जादूचे कनेक्शन आहे?

सौरभच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याने या प्रकरणात काळी जादू सारखा काही प्रकार असल्याबद्दल बोलले जात आहे. पण पोलिसांनी असा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे म्हटले आहे. ही सुनियोजित हत्या होती आणि याला काळ्या जादूचा अँगल देणे भरकटवणारा असू शकतो असे त्यांनी सांगितले.

“ही व्यवस्थित नियोजनानंतर कट रचून केलेली हत्या होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते ड्रमही टाकून देण्याची योजना आखू शकले असते. ते ड्रमचे काय करणार होते याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात येतील,” असेही सिंह यांनी सांगितले.

घटना कशी उघडकीस आली?

दरम्यान मुस्कान आणि साहिल हे शिमला येथून परत आल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. मुस्कान भाड्याने राहत होती त्या घराच्या मालकाने घर रिकामे करण्यासाठी कामगार पाठवले होते. त्यांनी मुस्कानला घरातील जड ड्रमबद्दल विचारले असता मुस्कानने त्यामध्ये कचरा असल्याचे सांगितले आणि ती तिच्या पालकांच्या घरी निघून गेली. पण दुर्गंध येत असल्याने कामगारांना संशय आळा आणि त्यांनी पोलिसांना बोलवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meerut murder latest update police officer shares key details on black magic extramarital affair rak