तालिबानी गटाचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला ठार मारून अमेरिकेने जाणूनबुजून शांतता चर्चेत खोडा घातला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला असतानाच पाकिस्तानी तालिबानी दहशतवादी गटाने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्थळ निर्माण केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या गटाचे अल् काइदासमवेत अत्यंत निकटचे संबंध होते, असे अमेरिकेने म्हटले आहे. हकीमुल्ला मेहसूद हा ‘वॉण्टेड’ होता, असेही अमेरिकेने स्पष्ट केले. हकीमुल्ला याला ठार मारण्यात आल्यानंतर अमेरिकेसमवेत असलेल्या संबंधांचा फेरविचार पाकिस्तानकडून केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.     ल्लअग्रलेख : द्रोणद्रोह