भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतने दुबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे घर दुबईतील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर असून त्याची किंमत ८० दशलक्ष डॉलर आहे. हा बंगला अतिशय आलिशान असून यात सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पाकिस्तानी सैन्यांनी स्पीकरवर लावलेल्या गाण्यावर भारतीय जवान थिरकले, पाहा सीमेवरील अनोखा VIDEO

लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे बंगला?

मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलासाठी घेतलेला हा आलिशान बंगला समुद्रकिनारी आहे. यात सर्व प्रकारच्या सुविधा असून यात १० बेडरूम आहेत. तसेच पाहुण्यासाठीही वेगळी व्यवस्था आहे. यासोबतच इनडोअर आणि आउटडोअर स्विमिंग पूल, जिम आणि एक सिनेमागृहही आहे.

शाहरुख खान असेल शेजारी

दुबई हे जगभर अतिश्रीमंत जीवनशैलीसाठी ओळखले जाते. दुबई सरकारकडूनही त्याचा प्रचार करण्यात येत आहे. दुबई सरकारने दीर्घकालीन गोल्डन व्हिसा देऊन जगभरातील श्रीमंत लोकांना येथे राहण्यासाठी बोलावले आहे. अंबानींपूर्वी बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनीही याठिकाणी घर खरेदी केले आहे. त्यामुळे आता शाहरुख खान आणि डेव्हिड बेकहॅम हे अंबानींचे शेजारी असणार आहे.

हेही वाचा – मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्समुळे रॅशेस झाले आहेत? या घरगुती उपचारांनी त्वरित मिळेल आराम

कोट्यावधींचे मालक आहे अनंत अंबानी

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत हे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अनंत अंबानी हे ९३.०३ अब्ज डॉलर्लचे मालक आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambanis youngest son anant ambani bought dubais most expensive home spb