स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याला सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. बलात्काराच्या आरोपांमुळे नारायण साई तुरुंगात आहे. आईवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे नारायण साई याने जामीन मंजूर करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांनी तीन आठवड्यांच्या जामीन मंजूर केला. जामीनाच्या कालावधीत नारायण साई याच्यावर पोलीसांची देखरेख असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. डिसेंबर २०१३ पासून नारायण साई सुरतमधील तुरुंगात कैदेत आहे. आसाराम बापूही लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली जोधपूरमधील तुरुंगात कैदेत आहेत. बलात्काराच्या खटल्यातील साक्षीदारांवर हल्ले करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर नारायण साई याला जामीन मंजूर झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2015 रोजी प्रकाशित
नारायण साई याला तात्पुरता जामीन मंजूर
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याला सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2015 at 02:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan sai gets temporary bail from hc