अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बीया पाठविण्याचे नियोजन करत असून, २०१५ पर्यंत चंद्रावर भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. चंद्रावर भाजीपाला फुलविण्यावर नासातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. पृथ्वीवरून चंद्रावर बिया पाठवून तेथील पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाल्यांची शेती करण्याचा प्रयोग नासा करुन पाहणार आहे. पंरुतु, तेथील हवामान शेतीसाठी कितपत उपयोगी ठरु शकेल यावर अजूनही शंकाच आहे.
त्याचबरोबर नासाकडून चंद्रावर एक रोपटेही पाठविण्यात येणार आहे. चंद्रावर हे रोपटे जिवंत राहीले तर पुढील संशोधनाला मदत होईल असे नासातील प्रवक्त्यांनी सांगितले.