US Sanctioned Four Indian Companies: अमेरिकेकडून इराणव गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. याच निर्बंधांचा एक भाग म्हणून इराणमधून निर्यात होणार्‍या तेलाची वाहतूक करणाऱ्या संलग्न कंपन्यांनाही आता ट्रम्प प्रशासनानं लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने यात इराणमधून निर्यात होणारं कच्चं तेल आणि पेट्रोलियमची उत्पादनं यांचा समावेश आहे. अशी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची यादीच अमेरिकेनं तयार केली असून त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यात भारतातील चार कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एक कंपनी नवी मुंबईतील आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील निर्बंध लादण्यात आलेल्या चार कंपन्यांचा इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करण्यात सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे. इराणवर ‘सर्वाधिक निर्बंध मोहीमे’अंतर्गत ही पावलं ट्रम्प प्रशासनाकडून उचलण्यात येत आहेत. निर्बंधांच्या यादीत एकूण ३० कंपन्या वा तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे. ही जहाजं वेगवेगळ्या देशांमधली आहेत.

नवी मुंबईतील कंपनीवर निर्बंधांची कारवाई!

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने निर्बंध घातलेल्या कंपन्यामध्ये ४ भारतीय कंपन्या आहेत. त्यात नवी मुंबईतील फ्लक्स मेरिटाईम एलएलपी (Flux Maritime LLP), दिल्ली एनसीआरमधील बीएसएम मरीन एलएलपी (BSM Marine LLP) व ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (Austinship Management Pvt Ltd) तर तंजावरमधील कॉसमॉस लाईन्स इंक (Cosmom Lines Inc.) या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी तीन कंपन्या या इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या व्यावसायिक वा तांत्रिक व्यवस्थापक असल्याच्या आरोप आहे, तर कॉसमॉस लाईन्स या कंपनीवर इराणच्या पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

“आज निर्बंध लादण्यात आलेल्या कंपन्यामध्ये यूएई व हाँगकाँगमधील तेलाच्या दलाल कंपन्या, भारत व चीन मधील टँकर मॅनेजर कंपन्या, इराणच्या नॅशनल इरानियन ऑईल कंपनीचे प्रमुख यांचा समावेश आहे. याशिवाय इराणच्या लाखो बॅरल तेलाची वाहतूक करणाऱ्या काही जहाज कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत”, अशी माहिती अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल अर्थात OFAC कडून देण्यात आली आहे.

याआधीही भारतीय कंपन्यांवर निर्बंध!

भारतीय कंपन्यांवर अमेरिकन प्रशासनाकडून अशा प्रकारे निर्बंध लादले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. उदाहरणार्थ, ऑक्टोबरमध्ये भारतातील गब्बारो शिप सर्व्हिसेस या कंपनीवर बंधनं लादण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत आणखी तीन कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai based company among two other from india us sanctions pmw