राष्ट्रवादीचे खासदार तारीक अन्वर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यवस्थ असतानाच त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्लीला आणण्यात आले. ६६ वर्षीय तारीक अन्वर बिहारमध्ये असताना त्यांची तब्बेत अचानक बिघडली त्यानंतर त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी ते बिहार दौऱ्यावर असताना त्यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर त्यांना बिहारमधल्याच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले.

तारीक अन्वर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.त्यामुळे त्यांना मंगळवारी दिल्लीत हलवण्यात आले. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. तारीक अन्वर हे बिहारच्या कटिहार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय आहेत. शरद पवारांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीची स्थापना केली होती तेव्हा त्यांच्यासोबत तारिक अन्वर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते आहे.