scorecardresearch

शरद पवार

sharad pawar

शरद पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्र राज्यातील बारामती शहरात झाला.


पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते १९६७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या मुख्यमंत्रीपद त्यांनी तीन वेळा भूषवले. १९८४ मध्ये, ते लोकसभेवर (भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह) निवडून आले आणि १९९१ पर्यंत त्यांनी संसद सदस्य म्हणून काम केले.


१९९९ मध्ये, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून हा पक्ष महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये एक प्रमुख राजकीय शक्ती बनला आहे. शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद, घोटाळ्यांशी पवारांचे नाव जोडले गेले होते.असे असले तरीही राजकारणातील कुशाग्र बुद्धीच्या जोरावर विविध पक्षांसह युती करुन ती टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवरुन त्यांचे कौतुकही झाले आहे.


शरद पवार कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कामांमधील त्यांच्या कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक वकील म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांनी देशाची आर्थिक धोरणे तयार करताना प्रामुख्याने व्यापार, उद्योग क्षेत्रात बहूमूल्य योगदान दिले.


पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे शरद पवार हे भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.


शरद पवार कोण आहेत?

शरद पवार हे भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आहेत.


शरद पवार यांचा जन्म कधी झाला?

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी झाला.


शरद पवार यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे?

शरद पवार हे पाच दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी १९६० मध्ये काँग्रेस पक्षातून प्रवेश करत राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.


शरद पवार यांच्या काही राजकीय कामगिरी काय आहेत?

शरद पवार हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर तीन वेळा विराजमान झाले होते. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. पवार यांनी राष्ट्रीय स्तरावर संरक्षण, कृषी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग अशी अनेक मंत्रीपदे सांभाळली आहेत.


शरद पवार अजूनही राजकारणात सक्रिय आहेत का?

होय, शरद पवार अजूनही राजकारणात सक्रिय आहेत आणि महाराष्ट्र तसेच भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती आहेत.


शरद पवार यांच्याशी संबंधित काही वाद काय आहेत?

शरद पवार त्यांच्या एकूण राजकिय कारकिर्दीमध्ये अनेक वादांमध्ये अडकले आहेत. IPL क्रिकेट घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याव्यतिरिक्त काही घोटाळ्यांमध्येही त्यांचे नाव जोडले होते. असे असले तरीही त्यांना एकाही प्रकरणामध्ये कायदेशीर शिक्षा झालेले नाही.


Read More
sharad pawar to participate in protest against onion export ban on mumbai agra national highway
कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार रस्त्यावर

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे

future of Karmala sugar factory hangs in the balance due to political conflict
राजकीय संघर्षातून करमाळ्याच्या साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील संघर्षातून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Jitendra Awhad
“शरद पवारांच्या हाताला पकडून बाहेर…”, राष्ट्रवादी कार्यालय वादाबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळत होती. कारण अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री…

sharad pawar ajit pawar news, sharad pawar ajit pawar on same stage in pimpri chinchwad
बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकाच व्यासपीठावर? ‘हे’ निमित्त…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत…

nagpur ncp office, cm ajit pawar group gets ncp office in nagpur
राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे, शरद पवार गट आक्षेप घेणार

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला.

sharad pawar banner news in marathi, just 10 day winter session banner in nagpur news in marathi
“फक्त दहा दिवसांच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत”, शरद पवार गटाकडून सरकारवर ‘बॅनरास्त्र’

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असताना पूर्वी तीन ते चार आठवडे अधिवेशन होत असे.

NCP National President Sharad Pawar will come to Nagpur on December 12 to organize a meeting at Zeromile
“संघर्ष यात्रेचा समारोप १२ डिसेंबरला,” कोणते नेते येणार? जाणून घ्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ डिसेंबरला नागपूर येथे येत आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थीतीत दुपारी २.०० वाजता झिरोमाईल…

Rohit Pawar on Sunetra Pawars Banner
Rohit Pawar on Sunetra Pawars Banner: पवार विरुद्ध पवार, बॅनरबाजीवरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

शरद पवार गटाला टक्कर देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुनेत्रा…

Rohit Pawar
अमरावतीत आदिवासी बांधवांचं नृत्य अन् रोहित पवारांची ढोलकी!; युवा संघर्ष यात्रेदरम्यानचा Video Viral

अमरावतीत आदिवासी बांधवांचं नृत्य अन् रोहित पवारांची ढोलकी!; युवा संघर्ष यात्रेदरम्यानचा Video Viral

संबंधित बातम्या

मराठी कथा ×