केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. “अर्थमंत्र्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या स्थितीची कल्पना नसल्याचे दिसते. सीतारामन यांनी फक्त निवडणुका असलेल्या राज्यांकडे लक्ष दिले आहे” अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी कुठल्या बजेटने केली नव्हती, इतकी निराशा या बजेटने केल्याचे चिदंबरम म्हणाले. “निर्मला सीतारामन यांनी गरीब आणि स्थलांतरीतांची फसवणूक केली. निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांची फसवणूक केली, खासकरुन खासदारांची. त्यांनी पेट्रोल, डिझेलसह अनेक उत्पादनांवर उपकर लावले. प्रतिलिटर पेट्रोलवर २.५० रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर चार रुपये. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी हा झटका आहे” असे चिदंबरम म्हणाले.

मद्यप्रेमींनाही झटका

या अर्थसंकल्पाने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. मद्य आणि तत्सम पेय (बिअर इत्यादीं)च्या किंमतीमध्ये अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmala sitharaman deceived those who were listening to her speech chidambaram dmp