Premium

रालोआत परतण्याची शक्यता नितीशकुमार यांनी फेटाळली

कुमार यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेले भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी जद(यू) चे प्रमुख नितीश यांचे वर्णन ‘शक्ती गमावलेले राजकीय दायित्व’ असे केले आणि त्यांनी नाक रगडले तरी त्यांचे पुन्हा स्वागत केले जाणार नाही, असे सांगितले.

nitishkumar
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार

पीटीआय, पाटणा : एक वर्षांपूर्वी त्याग केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) परतण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी फेटाळून लावली. याला प्रत्युत्तर देताना, नितीश यांनी परत येण्यासाठी गयावया केल्या, तरी त्यांचे स्वागत केले जाणार नाही, असे भाजपने सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुमार बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुमार यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेले भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी जद(यू) चे प्रमुख नितीश यांचे वर्णन ‘शक्ती गमावलेले राजकीय दायित्व’ असे केले आणि त्यांनी नाक रगडले तरी त्यांचे पुन्हा स्वागत केले जाणार नाही, असे सांगितले. नितीशकुमार हे भाजपसोबत सत्तेत असल्यापासून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते राजेंद्रनगर भागातील एका बागेत आले असताना हे नाटय़ घडले. भाजपशी विरोधाची भूमिका कायम असलेले राजदचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही त्यांच्यासोबत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitish kumar ruled out the possibility of returning to raloa ysh

First published on: 26-09-2023 at 02:45 IST
Next Story
इम्रान खान यापुढे रावळिपडीतील तुरुंगात