नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.
१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत. Read More
बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी…
जातनिहाय जनगणना यशस्वी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील दारूबंदी धोरणाचा राज्यातील जनतेवर कितपत परिणाम झाला याचा आढावा घेण्यासाठी घरोघरी…
खुल्या प्रवर्गातील लोकांकडे लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सरकारी नोकऱ्या आहेत. परंतु, ईबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सर्वाधिक असून, त्यांच्यातील सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण ०.९८…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माफी मागितल्यानंतरही, स्त्री-पुरुषसंबंधांबाबत बिहार विधिमंडळात त्यांनी केलेल्या ग्राम्य टिप्पणीमुळे वादाचे मोहोळ उठले, हे नजरेआड करता येत…