लोकपाल निवडीबाबतच्या प्रक्रियेसंदर्भात दुरूस्ती केल्याशिवाय लोकपालाची नियुक्ती करण्यात येणार नसल्याचे मत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केले आहे. या संदर्भात पुन:परीक्षण करून निवड प्रक्रियेत काही अंतिम दुरुस्त्या करण्याचे केंद्र सरकारने मान्य केल्याचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.
केंद्र सरकार लोकपाला संदर्भातील नियमांमध्ये बदल करणार असल्याची बातमी सर्वप्रथम इंडियन एक्स्प्रेसने दिली होती. यात लोकपाल पॅनेलमधील समावेशासाठी न्यायाधीशांना अर्ज दाखल करावे लागणार असल्याच नियम केंद्र सरकारकडून घेण्यात येणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज(सोमवार) लोकपालासाठी अशा प्रकारचे कोणतेही अर्ज न्यायाधीशांना पाठविण्याची गरज लागणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच इतरही काही नियमांमध्येही दुरूस्ती करणार असल्याचेही सांगितले आहे. त्याचबरोबर यातील शोध समितीबाबतीतील नियमांमध्येही दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मान्य केले आहे.
लोकपाल व लोकायुक्त कायदा होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असूनही अद्याप काहीही प्रगती झाली नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नोंदविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
‘नियमात सुधारणा केल्याशिवाय लोकपालाची नियुक्ती नाही’
लोकपाल निवडीबाबतच्या प्रक्रियेसंदर्भात दुरूस्ती केल्याशिवाय लोकपालाची नियुक्ती करण्यात येणार नसल्याचे मत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केले आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-05-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No appointment of lokpal till rules amended centre assures sc