Nobel Prize 2025: दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अत्यंत प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाते. यादरम्यान यंदाच्या शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. २०२५चे वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ई. ब्रुन्कोव, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आले आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते, यासंबंधीचा खुलासा करणाऱ्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तिघांची ओळख काय आहे?

मेरी ई. ब्रुन्कोव (जन्म १९६१) यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आहे आणि त्या सध्या त्या सिएटल येथील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टम्स बायोलॉजीमध्ये सीनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहेत.

फ्रेड रॅम्सडेल (जन्म १९६०) यांनी १९८७ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथून पीएच.डी. घेतली आहे आणि सध्या ते सॅन फ्रान्सिस्को येथील सोनोमा बायोथेरॅप्युटिक्स (Sonoma Biotherapeutics) मध्ये सायंटिफिक ॲडव्हायझर आहेत.

तर शिमोन साकागुची (जन्म १९५१) यांनी एम.डी. ही १९७६ आणि पीच.डी. ही १९८३ मध्ये जापानच्या क्योटो विद्यापीठातून मिळवली आणि ते ओसाका विद्यापीठात इम्युनोलॉजी फ्रंटीयर रिसर्च सेंटर येथील एक प्रख्यात प्राध्यापक आहेत.

त्यांनी कशाचा शोध लावला आहे?

त्यांच्या पेरिफेरल इम्यून टॉलरन्सवरील पायोनियरींग कामामुळे उघड झाले की, कशा पद्धतीने एक स्पेशल क्लासचे इम्यून सेल्स, ज्यांना रेग्युलेटरी टी सेल्स म्हणतात, हे ऑटोइम्यून रोगांपासून कशा पद्धतीने संरक्षणाचे काम करतात.

इम्यून सिस्टीम आपल्याला दररोज हजारो घुसखोरी करणाऱ्या माक्रोब्सपासून वाचवते. पण ओळखले जाऊ नयेत म्हणून अनेक पॅथोजीन्स हे मानवी सेल्सचे रूप घेतात, ज्यामुळे इम्यून सिस्टीमला बाहेरून आलेला धोका आणि शरिराचे स्वतःचे टीश्यू यातील फरक ओळखणे अत्यंत महत्वाचे ठरते.

पेरिफेरल टॉलरन्स (peripheral tolerance) म्हणजेच स्वत:ला इजा न पोहोचवण्याच्या इम्यून सिस्टीमागची यंत्रणा उलगडत या तीन शास्त्रज्ञांनी अनेक दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे.