खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही फरार आहे. अमृतपाल सिंग सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होते. अशातच आता अमृतपालचा एक ऑडिओ समोर आला आहे. त्यात अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा फेटाळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ऑडिओत अमृतपाल सिंग म्हणतो की, “या सर्व अफवा आहेत. सरकारसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची कोणतीही घोषणा केली नाही. मला जेलमध्ये जाण्याची भीती वाटत नाही. पोलिसांना काय करायचं ते करूद्या,” असं अमृतपाल सिंग यात सांगत आहे. याबाबत ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : भरसभागृहात भाजपा आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ लावला अन्…

दरम्यान, बुधवारी ( २९ मार्च ) अमृतपाल सिंगचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये अमृतपाल भारत आणि विदेशातील शिख समुदायाला अन्यायाच्या विरोधात लढण्याचं आवाहन करत आहे. हा व्हिडीओ एक ते दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, हा व्हिडीओ ज्या युट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झाला, त्यावर सरकारने बंदी घातली आहे.

या व्हिडीओत अमृतपाल सिंग म्हणाला, “शिख समुदायाने एक मोठ्या कारणासाठी एकत्र येणे गरजेचं आहे. सरकारने लोकांवर, महिला आणि लहान मुलांवर अत्याचार केले आहेत. अकाल तख्तचे जथेदार यांच्या २४ तासांच्या आवाहनाचेही सरकारने पालन केलं नाही.”

हेही वाचा : “राहुल गांधींमध्ये एवढी मुजोरी येते कुठून ? मोदी सरकारच्या विरोधात बोलण्याआधी..” अमित शाह यांचं वक्तव्य

“सरकारला मला अटक करायची होती, तर आत्मसमर्पण केलं असतं. पण, सरकारने अवलंबलेला मार्ग योग्य नाही. पोलीस बळाचा वापर करून, मला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या केसांनाही कोणी धक्का लावू शकत नाही. या खडतर प्रवासात वाहे गुरूंनी मला साथ दिली,” असं अमृतपाल सिंग म्हणाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not talk on surrender after video amritpal singh new audio viral ssa