Sam Altman Oliver Mulherin Marriage: ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन आता त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. सॅम अल्टमन यांनी त्यांचा बॉयफ्रेंड ऑलिव्हर मुल्हेरिनशी लग्न केलं. सॅम अल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन हे दीर्घकाळ रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या दोघांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन आणि त्यांचा बॉयफ्रेंड ऑलिव्हर मुल्हेरिन हे लग्नबंधनात अडकले आहेत. सॅम आणि ऑलिव्हर यांचा विवाह सोहळा कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. बुधवारी (१० जानेवारी) या दिवशी हवाईमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर नेटकरी चकित झाले. काहींनी तर हे फोटो AI जनरेटेड आहेत असाही दावा केला होता. मात्र सॅम अल्टमॅन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच ऑलिव्हर मुल्हेरिनने यांच्या अकाऊंटवरुनही लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

सॅम आणि ऑलिव्हर या दोघांची मैत्री खूप जुनी आहेत. ऑलिव्हर यांनी मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांनी दोन वर्षे मेटामध्येही काम केलं. २०२२ मध्ये त्यांनी कंपनी सोडली. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं आहे.

सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन यांची मैत्री खूप जुनी आहे. पण, दोघेही सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळा एकत्र दिसले आहेत. गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींच्या स्वागतासाठी आयोजित डिनरमध्ये दोघे एकत्र दिसले होते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Openai ceo sam altman marries longtime partner oliver mulherin at picturesque location scj